المدة الزمنية 5:12

फणसाच्या कुयरीची भाजी । ठेच कुयरी

بواسطة Konkan Recipes
2 316 مشاهدة
0
49
تم نشره في 2019/05/28

कोवळ्या फणसाला कुयरी म्हणतात आणि कोकणात फणसापासून खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या केल्या जातात. फणसाची कुयरीची भाजी ही अनेकांना परिचित असेल. पण "ठेच कुयरी" हा कुयरीच्या भाजीचा थोडासा वेगळा प्रकार आहे. ठेच कुयरी हा सिंधुदुर्गात जास्त दिसणारा प्रकार आहे. ठेच कुयरी साठी लागणारे साहित्य १. अर्धा चमचा मोहरी २. अर्धा चमचा जिरं ३. पाव चमचा हिंग ४. पाव चमचा हळद ५. चवीपुरती साखर ६. चवीपुरतं मीठ ७. चार चमचे उडीद डाळ ८. आवडीनुसार हिरवी मिरचीचा ठेचा ९. पाव चमचा लाल तिखट १०. कडीपत्ता ११. वरून फोडणीसाठी तेल, मोहरी आणि सुक्या मिरच्या कृती सर्वप्रथम कुयरी चिरून घेऊन त्याचे तुकडे करून घ्यावेत. त्याच्या फोडी कुकर मध्ये तीन शिट्या देऊन शिजवून घ्याव्यात. फोडी शिजतील एवढ्याच प्रमाणात पाणी घ्यावं. हि भाजी कोरड्या भाजीच्या प्रकारात येते. जास्त पाणी घालून शिजवू नये. कुयरीचे शिजलेले तुकडे बत्त्याने ठेचून घ्यावे. कढई मध्ये तेल गरम झालं कि क्रमाने त्यात मोहरी, जिरं, हिंग, कडीपत्ता, हळद आणि उडदाची डाळ घालावी. ते छान परतून घ्यावे; आणि त्या मध्ये ठेचलेले कुयरीचे तुकडे घालावे. त्या मध्ये हिरव्या मिरच्यांचा ठेचा आणि लाल तिखट घालून छान परतून घेणे. कुयरीच्या फोडी शिजलेल्या असल्यामुळे भाजी तयार होण्यास जास्त वेळ लागत नाही. एका पळीमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि सुक्या लाल मिरच्या घालून फोडणी करावी. तयार झालेली फोडणी भाजी वर ओतावी. वाढण्यापूर्वी तयार भाजीवर वरून भरपूर ओला नारळ घालावा. कुयरीची भाजी, ताक भाताबरोबर किंवा सोलकढी भाताबरोबर खूप सुंदर लागते. - - - फणस चिरणे हा तसा एक क्लिष्ट प्रकार आहे पण अगदीच अवघडही नाही. काही शहरांमध्ये भाजीवाल्यांकडे चिरलेली भाजीसाठी तयार कुयरी मिळू शकेल जी तुम्ही ह्याभाजी साठी वापरू शकता. तुम्ही जर घरीच कुयरी चिरणार असाल तर "कुयरी कशी चिरावी?" ह्यासंदर्भात खाली दिलेला व्हिडीओ अवश्य बघून घ्या. /watch/YwXhkk1t64Pth - - - नवनवीन रेसिपीज च्या माहिती साठी कृपया आमच्या चॅनेल ला Like (👍) आणि Subscribe (🔔) करा: /channel/UC1h7Q1--AWaprJaGTRGShVw #CookWithMe #konkanproducts #konkanrecipes #recipeinmarathi #howtocook #lostrecipes #food #sweet #yummy #yum #delicious #fresh #foodie #homemade #foodstagram #foodbloggers #foodblog #hungry #eats #cleaneating #foodphotography #foodpics #homecooking #foodlove #instaphoto #foodcoma #foodgram #chefmode #hungry #nom #foodstagram #eathealthy #eatwell #eatright #snack #instalove #goodeats #instafood #truecooks #eatingfortheinsta #foodstyling #foodforfoodies #eatinghealthy #eatgood #eattherainbow #eatrealfood #foodoftheday #foodography #foodism #foodaddict #foodforthought #foodisfuel #eating #eatingclean #eatstagram #foodspotting #foodlover #fooddiary #yums #foodshare #cooking #recipe #tasty #foodlovers #culinary #foodart #foodsnap #eatguide #happytummy #goodtaste

الفئة

عرض المزيد

تعليقات - 8